Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मेळाव्याआधीच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

येत्या काही तासांतच बीकेसी आणि शिवाजी पार्कवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणाची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार या नात्याने उद्धव ठाकरे गेल्या काही वर्षांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावरून ठाकरेंना डिवचलं आहे. मुलगा असल्याने कोणी वारसदार ठरत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे”, अशी हरिवंशराय बच्चन यांची एक पंक्ती एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला आहे. मुलगा असल्याने कोणीही उत्तराधिकारी बनत नाही. जो उत्तराधिकारी असतो तो मुलगा ठरेल, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button