Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागपुरात कोरोनाचा उद्रेक; 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
नागपूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळपाठोपाठ नागपूरमध्येही परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. नागपूरमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 995 नवे रुग्ण आढळले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 578 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ८८४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात जरीपटका, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, खामला, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, बजाज नगर हे हॉटस्पॉट बनले आहे.
दरम्यान, नागपुरात जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील ११ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजावर, शालेय परीक्षेच्या नियोजन व आरटीई प्रवेश प्रकियेच्या कामावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





