Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रचार समाप्तीनंतर सर्व माध्यमांतील निवडणूक जाहिरातींना बंदी : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या : छुप्या प्रचारावर आता निवडणूक आयोगाचा ‘‘वॉच’’

मुंबई : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचाराची मुदत मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपत असून, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांतून निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  १२ जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर, पण उर्वरित ZP अन् पंचायत समित्यांची निवडणूक कधी? मोठी माहिती समोर

श्री. वाघमारे यांनी सांगितले की, महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदीनुसार मतदान संपण्याच्या ४८ तास आधी म्हणजे दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत समाप्त होईल. त्यामुळे या वेळेनंतर कोणत्याही माध्यमातून निवडणूकविषयक जाहिराती देण्यास मनाई असेल. जाहीर प्रचार समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांतील जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन किंवा परवानगीचा प्रश्न उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सविस्तर तरतुदी आयोगाच्या दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५’मध्ये नमूद आहेत.

यावेळी सचिव सुरेश काकाणी यांनी तपशीलवार सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, इच्छूक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मात्र, सूचक व अनुमोदक यांची नावे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, त्याच प्रभागातील मतदार यादीत असणे बंधनकारक आहे. पक्षीय तसेच अपक्ष उमेदवाराला प्रत्येकी एक सूचक व एक अनुमोदक आवश्यक असतो. उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागांत नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतो; मात्र एका प्रभागातील एका जागेसाठीच तो निवडणूक लढवू शकतो. तसेच एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button