Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याला देणार संधी

DCM Eknath Shinde : विधानपरिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होत असल्याने पाचही जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळू शकते, असे बोललं जात आहे. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. मात्र यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. धुळे – नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव यात आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळणार अशी पक्षात चर्चा रंगली आहे. तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नाव चर्चेत असून सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं नेतृत्व म्हणून त्यांची सध्याची ठळक ओळख आहे.

हेही वाचा –  ‘मुस्लिम समाजातून अधिक IAS-IPS अधिकारी झाले तर…’, नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांचेही नाव चर्चेत आहे. संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी तसेच ठाण्याचे माजी महापौर आहेत. तर नागपूरच्या किरण पांडव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहेत.

विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली आहे. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी इच्छुक आहेत.

कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?

-चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून काँग्रेस पक्षात सक्रीय राजकारणात आहेत.

-चंद्रकांत रघुवंशी 1992 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.

-त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.

-आमदारकीची मुदत एप्रिल 2020 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

-त्यानंतर जुलै २०२२ रोजी त्यांनी एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button