Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Crop inspection extended : राज्यातील शेतरकऱ्यांच्या शेतामध्ये कीती क्षेत्रावर कोणती पीकं आहेत. याची शासनाकडे नोंदणी करण्यासाठी पीक पाहणी ही पद्धती वापरली जाते. यामध्ये ई पीक पाहणी ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. या पीक पाहणीला आता राज्यात शंभर टक्के पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात शंभर टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. या ई – पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पिक नोंदणी न झाल्यास नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी इ पीक पाहणी गरजेची आहे. दरम्यान राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ई पाहणीत 36 टक्के पिकांची नोंद झालेली आहे. मात्र आता मुदतवाढ मिळाल्याने उर्वरित शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा –  राज्यातील विद्यापीठांच्या कारभारावर राज्यपालांची नजर, दिले महत्वपूर्ण निर्देश…

प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन चांगलेच आक्रमक झालेत. न्यायालयाने आंदोलनाचे स्थळ रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी थेट जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्हाला अटक करा, ताब्यात घ्या अशी मागणी करत बच्चू कडू आणि इतर कार्यकर्ते, शेतकरी थेट पोलीस ठाण्याकडे निघाले आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button