Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ३१ नवे रुग्ण, एकूण संख्या ४२८ वर

रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा ४२८ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात ३१ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील २०, पनवेल ग्रामिण मधील ७, खालापूर मधील २ महाड मधील १ आणि पेण मधील एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामिण येथील एका रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.





