Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांवर जाणार, दिवसभरात नऊ मृत्यू

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांवर जाणार हे निश्चित आहे. आज आलेली आकडेवारी हेच सांगते आहे. तसंच महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
त्यामुळे करोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. यापैकी १९०० वर रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले. आज ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत एकूण २९५ जण हे बरे होऊन घरी गेले आहेत. करोनामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.





