Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: चिंताजनक! महाराष्ट्रात काल दिवसभरात 4841 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 47 हजार 741 वर
मुंबई : राज्यात काल (25 जून) दिवसभरात तब्बल 4 हजार 841 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहोचली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य यंत्रणा देखील प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.





