Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा! रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दावोस येथील World Economic Forum (WEF) 2026 मध्ये पहिल्याच दिवशी १४.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. हे करार १९ विविध कंपन्यांसोबत झाले असून यातून राज्यात १५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अशातच आता दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज्य सरकारने दावोस आर्थिक परिषदेत रायगड-पेण ग्रोथ सेंटर उभारण्या च्यादृष्टीने प्रस्ताव मांडला होता. यासाठी दावोसमध्ये एक महत्त्वाचा सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांमध्ये रायगड आणि पेण परिसरात एक महत्त्वाचा प्रकल्प येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात फक्त गुंतवणूकच येणार नाही तर  आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञानही भारतात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषद माहिती दिली.

हेही वाचा –पुणे मनपा हद्दीतील शाळा २३ जानेवारीला दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

मुख्यमंत्री म्हणाले…

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग उभारता येतील.शहरी नियोजनासंदर्भात महाराष्ट्र सरकारने दावोसमध्ये केलेल्या करारांमुळे आपली शहर नियोजनाची क्षमता वाढणार आहे.आगामी काळात महाराष्ट्रात दळणवळणाच्या दृष्टीने चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास या गुंतवणुकीमुळे मदत होईल.

रायगड-पेण ग्रोथ सेंटर उभारण्यात जागतिक कंपन्यांनाचा समावेश झाला आहे. या कंपन्यांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत वाचून दाखवली. त्या कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे : रिपब्लिक ऑफ कोरियाचा हनवा ग्रूप, स्वित्झर्लंडची एसएसबी कंपनी, अमेरिकेची फेडेक्स, फिनलँडची रिव्हर रिसायकल, दुबईची एमजीएसए, सिंगापूरची मेपल ट्री आणि ट्रिबेका डेव्हलपर्स

दावोस येथील परिषद पाच दिवसांची असून, १९ जानेवारीपासून सुरुवात झाली असून २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील दिवसांत आणखी कोणते महत्वाचे करार होतात ते पाहावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुंतवणूक जास्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भारतासाठी विदेशी गुंतवणुकीचे गेटवे बनले असल्याचे म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button