Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

फुलगाव येथे ग्रंथ दिंडी व संविधान गौरव दिंडी उत्साहात

शिक्षण विश्व : संविधान मूल्यांचा जागर – ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून जनजागृती

पुणे: एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व हरि उद्धव धोत्रे मोफत शाळा, फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फुलगाव येथे ग्रंथ दिंडी व संविधान गौरव दिंडीचे आयोजन करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी व वाचनसंस्कृतीचा प्रसार घडवून आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हरि उद्धव धोत्रे मोफत शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभारबाई व एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्री. अरविंद वागसकर यांच्या हस्ते भारतीय संविधानास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

हेही वाचा –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा! रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार

ही दिंडी १८६० साली स्थापन झालेल्या हरि उद्धव धोत्रे मोफत शाळेतून सुरू होऊन ग्रामपंचायत, विठ्ठल मंदिर मार्गे पुन्हा शाळेत येऊन समाप्त झाली. या दिंडीत सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दिंडीदरम्यान स्वयंसेवकांनी भजन, फुगडी, रिंगण यांसारखे पारंपरिक खेळ सादर करत सांस्कृतिक वातावरण निर्माण केले. संविधानाशी संबंधित घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमातून भारतीय संविधानातील मूल्ये, सामाजिक सलोखा, लोकशाहीची जाणीव तसेच वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाच्या हक्क, कर्तव्य आणि समानतेची जाणीव करून देणारा जीवनमार्ग आहे. ग्रंथ दिंडी व संविधान गौरव दिंडीसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये व समाजात संविधान मूल्यांची रुजवणूक होत असून वाचनसंस्कृती व सामाजिक एकोपा अधिक बळकट होतो.

– अरविंद वागसकर, एनएसएस अधिकारी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button