breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Maharashtra Weather | पुढील ४८ तासांत ‘या’ भागात गारपीटीची शक्यता!

Maharashtra Weather | राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशातच येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि परभणीसह इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील नागपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा    –      रणदीप हुड्डाच्या बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात दुपारी उन्हाचा कडका आणि रात्री हवेत गारवा अशी विचित्र स्थिती आहे. मुंबईमध्ये रविवारनंतर सोमवारीही संध्याकाळनंतर वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. त्यानंतर आज देखील मुंबईसह उपनगरातील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button