breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

रणदीप हुड्डाच्या बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Swatantryaveer Savarkar Trailer | अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. तो दरवेळी काहीतरी वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. यावेळी रणदीप हुड्डा हा विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच आता स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये सावरकर यांच्या जीवनातील मुख्य घटनांवर आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक मतभेददेखील उघडपणे दाखवण्यात आले आहेत. याबरोबरच सावरकरांना देण्यात आलेल्या दोन जन्मठेपेच्या शिक्षा, शिक्षा भोगून आल्यानंतर भारतात त्यांच्यावर अन् त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय, त्यांना मिळालेली दुय्यम वागणूक यावरही चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

हेही वाचा     –      ‘कवियत्री शांताशेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी ३ कोटी रुपये देणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार 

सावरकर यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बॉस, भिकाजी कामा, मदनलाल धिंगरा, भगत सिंह इत्यादि क्रांतिकराकांच्या भूमिकाही आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उत्कर्ष नैथानी व रणदीप यांनी मिळून याचे संवाद लिहिले आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button