Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपळे सौदागरमध्ये एमएसईबीच्या फिडर बॉक्सला आग

सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

पिंपरी : पिंपळे सौदागर मध्ये MSEBच्या फिडर बॉक्सला आज (दि.०५) सकाळी आग लागली होती. आरोग्य कर्मचारी आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या सतर्कतेमुळे ही आग तात्काळ आटोक्यात आली. घटनास्थळी MSEB आणि अग्निशामन विभागाचे कर्मचारी त्वरित दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आज (दि.५) ७ वाजता पिंपळे सौदागर येथील शिवसाई लेन रस्त्यावरील लोटस हॉस्पीटल समोर असणाऱ्या MSEB चा फिडर बाँक्सला आग लागली होती. ही बाब तेथे काम करत असलेल्या आरोग्य विभागाचा कर्मचारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरीत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना याबाबत कळवले. त्यानंतर नाना काटे यांनी MSEB चे उपअभियंता श्री. ननवरे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली आणि त्वरीत या फिडर बाँक्स वरील विद्युत सप्लाय बंद करण्यास सांगितले. तसेच अग्निशामक विभागाला देखील फोन करून नाना काटे यांनी कळविले. अग्निशामक व महावितरणचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवले व पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button