Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

३१ डिसेंबर ते १ जानेवारीला पुण्यात मोठा बंदोबस्त

सोशल मीडियावर देखील असणार पोलिसांची नजर

पुणे : ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी पुणे शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सगळ काही शांततेत पार पडेल, तसेच लागणाऱ्या सर्व उपाययोजना आम्ही चोख पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जनतेला कुठलाही त्रास होणार नाही, असं आश्वासन सुनील फुलारी यांनी दिलं आहे.

सोशल मीडियावर देखील आमची करडी नजर आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अनेक जणांवर आम्ही कारवाई देखील केली आहे पुणे पोलिसांकडून शांततेच्या बैठकी देखिल घेण्यात आले आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.

याशिवाय पुणे ग्रामीण पोलिसांकडून भिमा कोरेगाव येथे 7 पोलीस अधीक्षक 18 पोलीस उपाधिक्षक, 60 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक 2500 अंमलदार आणि 4 SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तसेच उद्या सर्वांनी शांततेत येवून अभिवादन करावे, असे आवाहन पोलिस प्रशालनाकडुन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button