क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

बीसीसीआयने टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याचं प्रमोशन

एकदिवसीय संघाचं कर्णधारपद शुबमनला

मुंबई : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे. रोहितने कर्णधार असताना तडकाफडकी टी 20i आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यामुळे रोहित फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार असल्याचं स्पष्ट होतं. रोहित या एकमेव फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून भूमिका पार पाडणार होता. मात्र बीसीसीआयने रोहितकडून एकदिवसीय संघाचं नेतृत्वही काढून घेतलं.

बीसीसीआयने 4 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने यावेळेस शुबमन गिल याची रोहितच्या जागी वनडे कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर जर्सी नंबर 45 परिधान करणाऱ्या रोहितची एक सोशल मीडिया जुनी पोस्ट व्हायरल झाली आहे.

कर्णधारपदावरुन हटवताच रोहितची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावरील पोस्ट पुन्हा व्हायरल झाली आहे. रोहितची ही पोस्ट 1, 2 नाही तर तब्बल 13 वर्षांआधीची आहे. रोहितच्या या पोस्टमध्ये 45 आणि 33 नंबरचा उल्लेख आहे. “एका युगाचा (45) अंत आणि एका नव्या (77) पर्वाची सुरुवात”, असं रोहितने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. रोहितच्या या पोस्टचा अर्थ काय होता? हे जाणून घेऊयात.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

रोहितचा 45 आणि शुबमन गिलचा 77 जर्सी नंबर असल्याचं भारतीय क्रिकेट चाहत्यांना माहित आहे. मात्र काही वर्षांपूर्वी रोहित आणि 77 नंबरचं खास कनेक्शन होतं. रोहितने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाताना 14 सप्टेंबर 2012 रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. रोहितचा तेव्हाही 45 हाच जर्सी नंबर होता. मात्र तेव्हा रोहितचं संघातील स्थान निश्चित नव्हतं. तसेच रोहितला बॅटिंगने काही करताही आलं नव्हतं. त्यामुळे रोहितने 77 नंबर असलेली जर्सी परिधान केली होती. त्यामुळे रोहितने ही पोस्ट केली होती.

रोहित आणि 77 नंबरचा योगायोग
आता 13 वर्षानंतर 77 जर्सी नंबर असलेला खेळाडू कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. शुबमन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून एकदिवसीय कर्णधारपदाची सूत्र स्वीकारणार आहे. उभयसंघात 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

श्रेयस अय्यर उपकर्णधार
दरम्यान शुबमनला कर्णधार केल्यानंतर बीसीसीआयने श्रेयस अय्यर यालाही मोठी जबाबदारी दिली आहे. बीसीसीआयने श्रेयसला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे श्रेयसच्या उपकर्णधार झाल्यानंतर कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button