Pune Crime : आळंदी पोलीसांनी केली मोटार सायकल चोरणाऱ्याला अटक
दिघी आळंदी वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड यांची विशेष कामगिरी

पुणे : दिघी आळंदी वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये रविवारी (दि.०२ ) डुडुळगांव जकात नाका येथे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी नंबर प्लेट नसलेली एक मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली. त्यास विचारणा केली असता तो संशयित वाटल्याने सदरचे वाहन दिघी आळंदी वाहतूक विभाग येथे जमा करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर वाहनाच्या मुळ मालकाची चौकशी केली असता सदर वाहन चोरी झाल्याचे समजले. निलंगा पोलीस स्टेशन, लातून येथे मोटर सायकल चोरीबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर वाहनाबाबत निलंगा पोलीस स्टेशन यांना माहिती कळविण्यात आली आहे.
आकाश संजय घाटोळे असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. वय २४ वर्ष, रा ताजणेमळा, मोर्यानगर, प्रेम रतन सोसायटीजवळ, च-होलीफाटा. सदरची मोटार सायकल ही पुढील कायदेशीर कारवाईसाठी निलंगा पोलीस ठाणे, लातूर यांचे ताब्यात दिली आहे.
पोलीस उप आयुक्त विवेक पाटील तसेच सहायक पोलीस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक राजीव रणदिवे, पोलीस नाईक थोरात, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गारोळे, पोलीस कॉन्स्टेबल डुमनर यांनी दिघी आळंदी वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये मोटार सायकल चौरास चोरीचे मोटार सायकलसह पकडुन विशेष कामगिरी केलेली आहे.





