Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

१६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी अखेर.. एसटीतर्फे इंधन बचत अभियानाचे आयोजन..!

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

भारत सरकारच्या पेट्रोलिअम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे एसटीमध्ये देखील यंदा १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी अखेर इंधन बचत अभियान राबविण्यात येत आहे.
एसटी महामंडळ तब्बल १८ हजार ५०० बसेसच्या माध्यमातून दररोज ६६ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करते. त्यासाठी दररोज एसटीला सुमारे १२ लाख १२ हजार लीटर इंधनाची (डिझेल) आवश्यकता असते. हे इंधन (डिझेल) एसटीला इंडियन ऑइल व भारत पेट्रोलिअम या भारत सरकारच्या अंगीकृत कंपन्यांद्वारे दिले जाते. साहजिकच जागतिक बाजारपेठेतील इंधनांच्या वाढत्या किंमतीचा विपरित परिणाम एसटीच्या अर्थकारणावर होणे स्वाभाविक आहे. यंदा इंधन दरवाढीचे संकट समोर असताना एसटी महामंडळाच्या चालकांना इंधन बचत अभियानातून डिझेल वाचविणे , पर्यायाने इंधनावरील अनावश्यक खर्च टाळण्याचे समुपदेशन करण्याबरोबरच पारंपरिक इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सुरक्षित व सुव्यवस्थित वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत इंधन बचती संबंधीच्या जनजागृती बरोबरच , चालकांना व्याख्याने , माहितीपट , भित्तीपत्रके , अवाहन पत्रके या माध्यमातून प्रबोधन व प्रोत्साहीत करण्यात येत आहे. याबरोबरच या अभियान काळात जास्तीतजास्त इंधन बचत करणाऱ्या चालकाचा सत्कार आगार पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाची व्याप्ती एसटी महामंडळाच्या ३१ विभागातील २५० आगारातील सुमारे ३५००० चालक व सुमारे १८००० यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून संपूर्ण राज्यभर पसरलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button