Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
साताऱ्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गोलमेज परिषदेचे आयोजन
सातारा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सातारा येथे आज गोलमेज परिषद पार पडत आहे. या परिषदेला भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह शिवेंद्र राजे भोसले हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा, मराठा ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्याकडून या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.





