Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या घालून हत्या

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम

मॉर्निंग वॉकला जाताना विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली. ते हजरतगंज भागातून सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते. दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लखनौतील हजरगंज परिसरात रणजीत बच्चन रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाले होते. ग्लोब पार्कमध्ये मित्रासमवेत फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यासोबतचे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले. तर, डोक्यात गोळी लागल्यानं रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यु झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजित पांडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि गुन्हे शाखा यांची सहा पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी रणजीत बच्चन यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button