Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘रॅनिटिडिन’च्या वापरावर तात्पुरती बंदी

आरोग्य संचालनालयाचे निर्देश

मुंबई : आम्लपित्त किंवा अ‍ॅसिडिटीच्या त्रासावर सर्रास वापरात येणाऱ्या रॅनिटिडिन या औषधाचा वापर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तात्पुरत्या काळापुरता बंद करण्याचे आदेश आरोग्य संचालनालयाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. दरम्यान राज्य अन्न व औषध प्रशासनाने रॅनिटिडिनच्या बाजारातील नमुन्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रॅनिटिडिन या औषधाचा समावेश असलेले रॅनटॅक, झिंटॅक, अ‍ॅसिलॉक असे जवळपास २५ हून अधिक बॅ्रण्डचा वापर केला जातो. केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने सूचित केल्यानुसार, या औषधामध्ये कर्करोगासाठी कारणीभूत घटक असल्याचा संशय आहे. त्यामुळे याची तपासणी करण्याचे आदेश विभागाने दिलेले आहेत.

रॅनिटिडिन हे गोळ्या आणि इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालयांमध्ये याचा वापर पुढील आदेश मिळेपर्यंत थांबविण्यात यावा, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

रॅनिटिडिन औषध असलेले बाजारात उपलब्ध असलेले दहा नमुने घेऊन त्यांची औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button