Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रिंगरोडसाठी जागा संपादित करण्याचे आदेश

  • पाच गावांमधील 42 हेक्‍टर जागेचे होणार संपादन : पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी भूसंपादन

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी हवेली तालुक्‍यातील पाच गावांमधील साडेचार किलोमीटर जागेसाठी सुमारे 42 हेक्‍टर जागेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ही जागा संपादित करण्याचे आदेश काढले आहेत.

पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली असा 33 किमीचा रिंगरोड होणार आहे. यातील 16 किलोमीटर रिंगरोडची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. तर, पिसोळी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द या पाच गावांमधील 42 हेक्‍टर जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव नुकताच जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या गावातील किती जमिनीची आवश्‍यकता आहे. त्याचे गट नंबर आणि भूसंपादन करण्यात येणारे क्षेत्र याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. ही सुमारे 42 हेक्‍टर जागा ही खासगी मालकीची आहे. सदर जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने ताब्यात घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा मोबदला ठरविणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button