Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६८ हजार २६५ वर

  • बुधवारी दिवसभरात मुंबईत १,१२५, पुण्यात २,३३१ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे 10 हजार 309 नवे रुग्ण आढळले, तर एका दिवसात सर्वाधिक 334 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 68 हजार 265 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 16 हजार 476 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. काल दिवसभरात 6 हजार 165 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यासह राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 5 हजार 521 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 1 लाख 45 हजार 961 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बुधवारी दिवसभरात कोरोनाचे १ हजार १२५ नवे रुग्ण आढळले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १९ हजार २२५ वर पोहोचली आहे, तर बुधवारी दिवसभरात ७११ जणांनी कोरोनावर मात केली असून मुंबईत आतापर्यंत ९१ हजार ६७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २ हजार ३३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात पुणे शहरातील १ हजार १०१ जणांचा समावेश आहे. यासह पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ३०९ वर पोहोचला आहे. तर बुधवारी दिवसभरात ४६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या २ हजार २३१ इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button