मुंबई महापालिकेत फेरीवाल्याचे आंदोलन, आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर फेरीवाल्यांनी विविध मागण्यासाठी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयुक्त अजोय मेहता यांना भेटून मुंबई महापालिकेतून बाहेर पडताना फेरीवाल्यांचे अचानक आंदोलन सुरू झाले. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे काहीवेळ प्रशासन आणि बीएमसीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन करणाऱ्या एका फेरीवाल्याने बीएमसी इमारतीच्या छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकाने वेळीच त्याला रोखले आणि अनर्थ टाळला. फेरीवाल्याने भाज्यांची टोपली मनपा इमारतीच्या प्रवेशद्वारावर ठेवत आंदोलन केले.
मुंबईच्या आयुक्तांची भेट घेतल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीका केली आहे. एवढंच नाही तर महापौर बंगला कोणत्याही परिस्थितीत जिमखान्याच्या जागेवर होऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना सत्तेत आहे, अशात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी यांना भूखंड मिळत नाही.यारखे दुर्दैव नाही असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. अधिकारीही हायकोर्टाचे आदेशही आता धुडकावून लावायला लागले आहेत, यासाठीची मी आयुक्तांना भेटलो आहे, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे





