Breaking-newsमहाराष्ट्र
परभणीत नगरसेवकाच्या मुलाने एका दिवसात बोगस 700 शिधापत्रिका वाटल्याचा आरोप

परभणी : कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आपात्कालीन परिस्थितीत प्रशासन प्रत्येक नागरिकापर्यंत अन्नधान्य पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच शासनाकडून येत असलेल्या राशन धान्याचा पुरवठाही वेळेवर होत असताना, परभणीतील एका नगरसेवकाच्या पुत्राने तहसीलमध्ये बसून तब्बल 700 बोगस शिधापत्रिका तयार करुन घेत, धान्य वाटप केल्याचा आरोप होत आहे. भाजपचे आमदार संजय जाधव यांनी हा आरोप केला आहे.

खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बोलताना दिली.





