Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दक्षिण मुंबईतील सिंदिया हाऊसला आग

मुंबई : दक्षिण मुंबईतील सिंदिया हाऊस या इमारतीला भीषण आग लागली आहे. फोर्ट परिसरातील बॅलार्ड इस्टेट येथील इन्कम टॅक्स ऑफिसजवळ ही इमारत आहे. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या गच्चीवर पाच व्यक्ती अडकल्या होत्या. ज्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.  अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती आलेली नाही.

इन्कम टॅक्स खात्याचं ऑफिसही या इमारतीत असून या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. विविध देशी व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांसाठी हा विभाग प्रसिद्ध असून या परीसरात चांगलीच वर्दळ असते. परीसरात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी या आगीचे फोटो व व्हिडीयो काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले आणि हे वृत्त सगलीकडे पसरले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button