‘डिसले गुरुजीं’ना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
!['डिसले गुरुजीं'ना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Ranjit-disle.jpg)
पुणे |महाईन्यूज|
युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार मिळवणारे गुरुजी रणजितसिंह डीसले यांना ‘महाराष्ट्र पुरस्कार’ देवून सन्मानित करावे, अशी मागणी स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार मिळवणारे गुरुजी रणजितसिंह डीसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने ‘शिक्षण सुधारणा समिती गठीत’ करून प्रत्येक वर्षी 1000 शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे, तसेच राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पालकांचा खाजगी शिक्षण संस्था कडील कल कमी होईल. सरकारी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावेल, असेही म्हटले आहे.
दरम्यान, डिसले गुरजी हे ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार मिळवणारे हिंदुस्तानातील पहिले शिक्षक ठरले आहेत. भारतातील सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले गेले परंतू याच्या ही पलिकडे जाऊन त्यांचा गौरव करायला हवा. आपण फक्त एका व्यक्तीचा सत्कार करणार नसून प्रत्येक खेड्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाचा सन्मान करणार आहात, असेही स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनी निवेदनात म्हटले आहे.