Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंता करायचे कारण नाही, अजित पवार आपली भूमिका स्वतः स्पष्ट करतील – शरद पवार

मुंबई, महाईन्यूज

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित झाले. त्यांची कौटुंबिक बाठकही झाली. त्यात खासदार सुप्रिया सुळे, चिरंजीव हे देखील उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार बाहेर पडताच मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले. त्यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे माजी भूमिका स्पष्ट करतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले.

तर शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी राजीनामा का दिला, हे त्यांच्याच तोंडून ऐका. चिंता करायचं कारण नाही, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे. ती चर्चा केवळ राजकीय नव्हती. कौटुंबिक चर्चा होती. थोड्याच वेळात त्यांची बैठक आहे. बैठक संपल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ते भेटतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही पवार यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button