Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

खाद्य पदार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर द्यावा !

डॉ. भारती चव्हाण : कलादर्पण महिला हस्तकला प्रदर्शन

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दिवाळी सणानिमित्त प्रतिभा महाविद्यालयाच्या महिला कल्याण समितीच्या वतीने एक दिवसीय कलादर्पण महिलाच्या हस्तकलेचे प्रदर्शन व विक्री हा उपक्रम महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालक यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आला, त्यात घरगुती फराळ, वस्तू, आकाश कंदील आदींचा समावेश होता. याचे उद्घाटन मानीनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. भारती चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाल्या, कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या नेतृत्वाखाली अल्पवधीतच पिंपरी चिंचवड शहरात उत्कृष्ठ व्यवस्थापन व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनामुळे संस्था नावारूपाला आली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यातच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, भावी आदर्श नागरिक घडावा, यादृष्टीने विद्यार्थी दशेतच स्वयंरोजगार खेळ, कला, नाट्य क्षेत्रातही महाविद्यालय प्रगती पथावर आहे. आज समाजपयोगी विद्यार्थी उपयोगी उपक्रमाद्वारे विद्यार्थी, पालकांनी बनविलेल्या घरगुती उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. वस्तू निर्मितीच्या गुणवत्तेवर विशेष भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. भारती चव्हाण यांच्याहस्ते पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्पर्श नॉट रिचेबल एकांकिकामध्ये पंडीत सत्यदेव दुबे स्मृती सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखन, पुरस्कार अनुश्री देशमुख या विद्यार्थ्यांना मिळाला होता. त्याप्रित्यर्थ स्मृतीचिन्ह प्रदान करून कलाकारांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्यप्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया म्हणाले, सध्या महाविद्यालयात 6500 विद्यार्थी विविध शाखेत शिक्षण घेत आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या वतीने बनविण्यात येणार्‍या वस्तूंना बाजारपेठ मिळावी. या उदात्त हेतूने दिवाळी सणाचे औचित्य साधून एक दिवसीय हस्तकलेचे प्रदर्शन व विक्रीचे नियोजन महाविद्यालयाच्या महिला कल्याण समितीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी, डॉ. जयश्री मुळे आदींनी स्टॉलधारकांना भेट दिली.
या उपक्रमाचे सूत्रसंचालन महिला कल्याण समितीच्या समन्वयिका प्रा. रूपाली देशपांडे यांनी केले., आभार प्रा. तृप्ती महाबरे यांनी मानले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button