Breaking-newsपिंपरी / चिंचवड
हिंजवडीत चाकुचा धाक दाखवून चोरी करणारे दोघे अटकेत

हिंजवडी:- हिंजवडी परिसरात चाकुचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी हा तडीपार होता. तसेच या दोघांकडून पॉच मोबाईल, चार हजारांची रोख असा एकूण ७५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी या दोघांकडून एकूण चार गुन्ह्यांची उकल केली आहे.
सतिश साहेबराव सावंत (वय ३०, रा. दुर्गा कॉलनी, घर क्र.४, गणेशनगर, थेरगाव) आणि विकास संभाजी तनपुरे (वय २०, रा. जय गणेश कॉलनी, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी विकास हा सराईत गुन्हेगार असून त्याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होती. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.






