Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काळवीट शिकार: सलमान दोषी; थोड्याच वेळात शिक्षा

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. थोड्याच वेळात सलमानला शिक्षाही सुनावण्यात येणार आहे.
सकाळी सुनावणी सुरू होताच सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे विचारण्यात आले. पण त्याने सर्व आरोप फेटाळले. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. मात्र, सलमानला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या अन्य कलाकारांना दोषमुक्त करण्यात आले. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला.
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता सलमान खान जोधपूरला आला होता. त्यावेळी काळवीटाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शिकार झाली तेव्हा सलमानच्या गाडीत अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खानही होता. शिकार करण्यासाठी त्यांनीच सलमानला भरीस घातल्याचा आरोप होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button