Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
उपमहापौरांच्या प्रभागात खड्डे

पुणे- “आमच्या प्रभागात खड्डे नाहीत, असे मुख्यसभेत दावा करणाऱ्या उपमहापौरांच्या प्रभागात किती खड्डे आहेत पाहा,’ असे म्हणत महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी उपमहापौरांच्या प्रभागातील खड्ड्यांचे छायाचित्रच दिले आहेत. “यावरून उपमहापौर प्रभागात फिरतच नाहीत बहुदा,’ अशी टीकाही तुपे यांनी केली.
गुरूवारी झालेल्या महापालिका मुख्यसभेत “आपल्या प्रभागात खड्डे नाहीत,’ असे वक्तव्य उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले होते. त्यावर तुपे यांनी नागपूर चाळ या डॉ. धेंडे यांच्या प्रभागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढले. एवढेच नव्हे, तर जेथे खड्डे दुरुस्ती सुरू होती त्याचेही छायाचित्र काढून प्रसिद्धीमाध्यमांना दिले. डॉ. धेंडे यांच्या प्रभागातील नागपूरचाळ बाजारपेठ, शांतीनगर मार्गे खडकीत जाणारा रस्ता अशा काही रस्त्यांचे फोटो तुपे यांनी काढले आहेत.
- विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिले छायाचित्र





