Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे-लोणावळा चौपदीकरण रेल्वे मार्गासाठी प्रसंगी न्यायालयात जनहित याचिका!

प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली : पिंपरी-चिंचवड प्रवासी संघाची आक्रमक भूमिका

पिंपरी-चिंचवड : पुणे-लोणावळा चौपदीकरण रेल्वे मार्गासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार किंवा आत्मदहनाचा मार्ग अवलंबन करणार आहोत. पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या हितासाठी केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद नाही. प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याचा आम्ही निषेध करतो आणि पुढील काळात प्रवाशांच्या हितासाठी टोकाचा निर्णय घेणार आहोत, अशी संपत्प प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर केले. यामध्ये रेल्वे सुविधांबाबत निराशा केली आहे. महाराष्ट्रातून केंद्राला एकूण बजेटपैकी 38 टक्के निधी दिला जातो. पण, पुणे जिल्ह्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. पुणे-लोणावळा लोकलने आज रेल्वेने दररोज सव्वालाख प्रवासी प्रवास करतात त्याबाबत धोर निराशा केली आहे.

पिंपरी-चिंचवड प्रवासी संघ 1989 सालापासून प्रवाशांना भेडसावणार्‍या अडचणी, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.वेळोवेळी पत्रव्यवहार, वैयक्तिक भेटी घेवून निवेदन रेल्वे विभागाला दिले आहेत. उपयोग न झाल्यामुळे चिंचवड रेल्वे स्थानकावर उपोषण, आंदोलने, आत्मदहनासारखा मार्ग अवलंबावा लागला. त्यानंतरच आज पुणे-मुंबई सिंहगड, कोल्हापूर, मुंबई कोयना एक्सप्रेस, पुणे-इंदौर, पुणे-नाशिक, भूसावळ, नांदेड-पनवेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा येता-जाता मिळू लागला आहे. मात्र, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस अद्याप सुरू केली नाही.

पिंपरी-चिंचवड शहर जगविख्यात औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या आज 27 लाखाहून अधिक आहे. या शहरात अंतरराष्ट्रीय उद्योग समूह आहे. 650 मोठे उद्योग समूह आहे व 10 हजाराच्या आसपास मध्यम व लघू उद्योग, व्यवसायिक आहेत. या शहरात गुजरात, आंध्र प्रदेशातील परिसरातील 2 लाख लोक वास्तव्य करतात. दक्षिण भारतातील केरळ, मद्रास परिसरातील 3 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार परिसरातील 5 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. पश्चिम बंगाल, कलकत्ता परिसरातील दीड लाख लोकसंख्या आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, बीड, लातूर, कोकण, मुंबई, सोलापूर आदी भागातील 8 लाखांहून अधिक लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहेत. कमी कालावधीत उद्योग व्यवसाय वाढीमुळे दिवसेंदिवस या शहरात प्रचंड लोक नोकरी, व्यवसायाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. दररोज 150 हून अधिक एक्सप्रेस गाड्या, मालवाहू गाड्यांची ये-जा असते. पुणे येथे किंवा कल्याण, दादर, पनवेल येथे जावून पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आज येत आहे. मात्र, याबाबत अर्थसंकल्पामध्ये काहीही धोरण नाही, अशी खंत भालदार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  ‘सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील मागासवर्गीय कुटुंबे आणि महिलांना मोठ्या प्रमाणात विकासाची संधी देणारा अर्थसंकल्प’; आमदार अमित गोरखे

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के रेल्वे प्रवासीयांवर अवलंबून आहेत. त्याचा विचार केला पाहिजे, अशी मागणी पिंपरी- चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी मनोहर जेठवाणी, नारायण भोसले, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, नयन तन्ना, नंदू भोगले, दिलीप कल्याणकर, निर्मला माने, दादासाहेब माने, सल्लागार अ‍ॅड. मनोहर सावंत यांनी केली आहे.

रेल्वेभाडे वाढमुळे प्रवाशांत नाराजी…

पुणे-लोणावळा दरम्यान सुमारे सव्वा कोटीहून अधिक लोकसंख्या असून तळेगाव, चिंचवड, भोसरी, तळवडे, चाकण परिसरात उद्योग व्यवसाय, कर्मचारी वर्ग, मोलमजूरी करणारे, शिक्षण आदी कामांसाठी गोरगरीब मध्यमवर्गीय प्रवासीयांना पुणे-लोणावळा लोकलवर अवलंबून रहावे लागत आहे. पुणे-लोणावळा दरम्यान 4 युनिट लोकल गाड्या दिवसभरात 42 फेर्‍या करतात. दररोज 1 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. एक्सपे्रस गाड्या, मालवाहतूक, लोकल तिकीटांतून केंद्रीय रेल्वे खात्याला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. नागरिकांना सुविधा मात्र आज मिळत नाही. कोरोना प्रादुर्भाव काळात प्लॅटफॉर्म तिकीटांपासून रेल्वेचे भाडेवाढ केल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय प्रवासीयांना त्यांच्या गावी ये-जा करते. आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

महानगरपालिका प्रशासनाची उदासीन भूमिका…

पुणे-लोणावळा दरम्यान लोकल वाढसाठी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने 1989 सालापासून प्रयत्न करीत आहे. रेल्वे अधिकार्‍यांना भेटले असता निधी उपलब्ध नाही, मुंबईतच लोकल कमी पडतात, लोकल रेक (युनिट लोकल) उपलब्ध झाल्या तर, पुणे-लोणावळा दरम्यान नवीन लोकलवाढ होवू शकते. गेल्या 35 वर्षात रेल्वे मंत्री, मध्यरेल्वे महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्ड यांच्या बरोबर सातत्याने चिंचवड प्रवासी संघ पत्रव्यवहार करीत असताना रेल्वे विभागाकडून अनेकवेळा लेखील पत्र व आश्वासनच मिळाले. अशातच जानेवारी 2020 साली मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, राज्य शासनाने पुणे-लोणावळा दरम्यान 63 किलोमीटर रेल्वे मागावर तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी एकूण 4300 कोटी रूपयांच्या खर्चापैकी पुणे महानगरपालिकेने 375 कोटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 250 कोटी रूपयांचा खर्च उचलणे बंधनकारकच आहे. तो त्यांनी न दिल्यास संपूर्ण प्रकल्प गुंडाळला जावू शकतो पर्यायाने एकही नवीन लोकल पुणे-लोणावळा दरम्यान सुरू होऊ शकणार नाही., असे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.

आमदार, खासदारांचेही दुर्लक्ष…

सन 2020 सालापासून आजपर्यंत चिंचवड प्रवासी संघाने माहिती घेतली असता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांची मानसिकता रेल्वे विभागाला आवश्यक निधी 5 ते 10 टक्के एकूण खर्चाच्यापैकी देण्याची दिसून आली नाही. याचा चिंचवड प्रवास संघ निषेध करीत असून दोन्ही महापालिका व राज्य शासनाने पुढाकार घेतला असता महाराष्ट्र शासनाने रेल्वेला त्वरीत निधी दिला पाहीजे , तर, पुणे लोणावळा दरम्यान रखडलेले चौपदरीकरण रेल्वे मार्गाचे काम आज मार्गी लागले असते. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील खासदार, आमदारांनी देखील हव्या त्या प्रमाणात पाठपुरावा केल्याचे दिसून आले नाही. रेल्वे विभाग देखील दोन्ही महानगरपालिकेचे 625 कोटी रूपये तसेच, राज्य शासनाचा निधी न मिळाल्यामुळे पुणे-लोणावळा चौपदरीकरणाचा प्रश्न सुटू न शकल्यामुळे आज पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणार्‍या एक लाखांहून अधिक प्रवासीयांची ससेहोलपट होत असून त्यांचा वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

लोकल सेवा वाढवण्याची आवश्यकता…

पुणे-लोणावळा दरम्यान 11 मार्च 1978 साली पुणे-लोणावळा दरम्यान पहिली लोकल धावली. त्यानंतर 1982 सालापर्यंत तीन युनिट लोकल धावू लागल्या आज 4 युनिट लोकल धावत आहे. प्रथम अकरा, नंतर बारा डब्याच्या आज लोकल वेळोवेळी मागणी केल्यानंतरच प्रवासी सेवेसाठी धावत आहे. गर्दीमुळे आज दरवर्षी 250 हून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडत आहेत. सकाळी ११ ते दुपारी दोन पर्यत लोकलच नाही . महीला . मुलीचे अतोनात हाल होत आहे . गर्दीत हाणाऱ्या अपधातामध्ये अनेक प्रवासी जखमी होत आहे. याचा विचार रेल्वे विभाग दोन्ही महापालिका, राज्य शासन व केंद्र सरकार करीत नाही. याचा निषेध प्रवासी व प्रवासी संघटना वारंवार करीत आहे. सन 2019 साली चिंचवड येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचा चिंचवड रेल्वे स्थानकावर पाहणी दौरा होता. त्यावेळी देखील त्यांना चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने लेखी निवेदन दिले. परंतु, अनेक मागण्याकडे रेल्वे विभागाने दुर्लक्ष केले आहे. आता चिंचवड प्रवासी संघ पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवासीयांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. किंवा प्रवासी मेळावे घेवून आत्मदहन सारखा कठोर मार्गाचा अवलंब करणार आहोत .स्थानिक खासदार, आमदारांनाही पत्रव्यवहार करून त्याच्या पाठींब्याचे पत्रे, महाविद्यालयाचे, उद्योगसमूह आदीचे पत्र घेवून जनहित याचिका दाखल करणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

नवीन रावेत रेल्वेस्थानक निर्माण करावे…

आकुर्डी-देहूरोड दरम्यान पाच किलोमीटरचे अंतर असून रावेत परिसरात आज दीड लाखांहून अधिकची लोकसंख्या झाली आहे. नवीन रावेत रेल्वे स्थानक निर्माण करण्यात यावे. कोरोना काळात बंद केलेल पुणे भूसावळ एक्स्प्रेस पुन्हा सुरू झाली पाहीजे चिंचवड येथे , दादर ते चेन्नई एक्सप्रेस, कन्याकुमारी ते मुंबई एक्सप्रेस, श्री छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर टर्मिनल) ते अहमदाबाद एक्सप्रेस, मुंबई, हैद्राबाद एक्सप्रेस, रेणुगुंठा येथे बालाजी मंदिर आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांसाठी लोकमान्य टिळक ते चेन्नई एक्सप्रेस गाडी अजमेरला जाणारी एक्सप्रेस गाडीला चिंचवड येथे ये-जा थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा गेली ३० वर्षे करीत आहे. या एक्सप्रेस गाडीसाठी पुणे येथे ये-जा करण्यासाठी रिक्षाने 400 ते 500 रुपये खर्च येतो, वेळ जातो या एक्सप्रेस गाड्या चिंचवड येथे थांबणे गरजेचे आहे.

पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस थांबा मिळावा…

पिंपरी चिंचवड शहरात कोकण, चिपळून, गोवा, मेंगलोर, मडगाव भागातील प्रवासीयांसाठी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस थांबा मिळाला पाहिजे. भाविकांसाठी पुणे ते हरिद्वार नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी. चिंचवड येथे आज अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना प्रवासीयांना सामानासहीत चढ-उतार करणे शक्य होत नाही, त्यासाठी चिंचवड येथे एक्सलेटर (सरकता जिना) काम मंद गतीने चालू आहे . .. चिंचवड येथे दोन्ही बाजूला प्रवासीयांच्या सोयीसाठी रिक्षा थांबा पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणे रेल्वेच्या हद्दीतच होणे गरजेचे आहे. चिंचवड येथे पुर्वेच्या दिशेला गेल्या 27 वर्षापासून नोंदणीकृत रिक्षा थांबा आहे. रेल्वे पोलीसांनी रिक्षा थांब्याचे फलक काढून टाकले आहे. महाविद्यालयीन मुलांच्यासाठी सवलतीचे पास घेण्यासाठी रेल्वे पास आरक्षण पुस्तिका आज पुणे येथे मिळतात ते चिंचवड येथे उपलब्ध झाले पाहिजे. अनेक महाविद्यालयांना पुणे येथे जावून रेल्वे पास आरक्षण पुस्तिका आणण्याची वेळ येत आहे. सिंहगड एक्सप्रेसला एकवीस डबे असले पाहीजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button