Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उद्यापासून समुद्राला मोठे उधाण

  • ८ ते १३ सप्टेंबरदरम्यान ४.८५ मीटर उंचीच्या लाटा

येत्या ८ सप्टेंबरपासून सलग सहा दिवस समुद्राला मोठे उधाण येणार असून समुद्रकिनाऱ्यावर ४.५३ मीटर ते ४.८५ मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय होऊन नागरिकांना फटका बसला होता. या महिन्यात समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनाऱ्यालगत मोठय़ा प्रमाणावर कचरा आला होता. मरिन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया येथे लाटांसोबत मोठय़ा प्रमाणावर कचरा आला होता. या किनाऱ्यांवर साफसफाई करण्यासाठी पालिकेला स्वच्छता मोहीम राबवावी लागली होती. समुद्राला ८ ते १३ सप्टेंबर या काळात मोठे उधाण येणार असून ४.५३ मीटर ते ४.८५ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

गिरगाव, मरिन ड्राइव्ह, दादर, जुहू, वेसावे, सात बंगला, वेसावे, गोराई, मढ, मार्वे आदी समुद्रकिनाऱ्यांवर दररोज मोठय़ा संख्येने पर्यटक जात असतात. मात्र ८ ते १३ सप्टेंबर या काळात समुद्राला येणारे मोठे उधाण आणि किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा लक्षात घेता पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button