Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमच्या पोटाला हैवान जन्मला, तत्काळ फाशी द्या; आई-वडिलांची धक्कादायक प्रतिक्रिया

जळगाव – रावेर हत्याकांड बलात्कार करण्याच्या प्रयत्नातून घडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. तर, आरोपींच्या आई-वडिलांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मुलांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी केलेले कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे, असं आरोपींच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन संशयीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने चारही अल्पवयीन बालकांची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय अहवालात या मृत्युमुखी पडलेल्या चार अल्पवयीन मुलांमधील 14 वर्षीय मुलीवर आरोपींकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर, आरोपींच्या आई-वडिलांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मुलांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी केलेले कृत्य धक्कादायक असून माणुसकीला काळिमा फासणारा आहे, असं देखील आरोपींच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.

खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची नेमणूक

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळासह पीडित कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यानंतर पत्रकारांशी बोलतांना हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली. बोरखेडा येथील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी चांगल्यारितीने केला आहे. पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे. आरोपींना ताब्यात घेवून पोलिसांनी योग्यरितीने चौकशी केलेली आहे. हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालविला जाणार आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करीत असल्याची घोषणा देखील अनिल देशमुख यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button