Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…अखेर देवेंद्र फडणवीस यांची ‘त्या’ट्ट्वीटबाबत जाहीरपणे दिलगिरी; तरीही कोल्हापूरात प्रवेश नाहीच!

कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका ट्विटवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना ट्वीट करून अभिवादन केलं होतं. त्यावेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असं संबोधलं होतं. यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख कार्यकर्ते असा केल्यामुळे फडणवीसांविरोधात संतापाची लाट उसळली होती. सदर प्रकरणी खासदार संभाजीराजे यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली होती. याच ट्वीटला रिप्लाय करत देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.’

फडणवीस यांना कोल्हापूरात प्रवेश नाही : शिवसेना

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात प्रवेश देण्यात येणार नाही, अशी भूमिका कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली होती. त्यानंतर कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी निदर्शनंही करण्यात आली होती. तसेच सदर प्रकरणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी एक ट्वीट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button