breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

अंबानींच्या लेकाच्या लग्नात दिली जाणार मेड इन महाबळेश्वर गिफ्ट्स!

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Ceremony : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरने मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १ ते ३ मार्चदरम्यान अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग सेरेमनी पार पडणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हा सोहळा होणार असून यासाठीची तयारी सुरु झाली आहे. या सोहळ्याला भारतामधील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्योग जगताबरोबरच मनोरंजन, क्रिडा आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला हजर असतील.

जामनगरमधील प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना भारतीय संस्कृतीची झलक कार्यक्रमस्थळी पाहायला मिळणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मार्चेंट यांच्या लग्नाच्या या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वमध्ये तयार केलेली एक खास भेटवस्तू दिली जाणार आहे. महाबळेश्वरमधील नेत्रहीन कारागिरांनी तयार केलेल्या विशेष सुगंधी मेणबत्त्या पाहुण्यांना भेट दिल्या जाणार आहे. याचबरोबर गुजरातमधील कच्छ आणि लालपूरमधील महिला कामगारांनी तयार केलेले पारंपारिक स्कार्फही भेट दिले जाणार आहेत.

हेही वाचा – पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; विद्यार्थ्यांसाठी दोन मोठे बदल

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान आणि रजनीकांत यांच्यासहीत अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कटरिना कैफ, करण जोहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि करिश्मा कपूरही प्री-वेडिंग सेरेमनीला उपस्थित राहणार असल्याचं समजतं.

स्वदेश ऑनलाइन या इन्स्टाग्राम पेजवरुन अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दिल्या जाणाऱ्या भेट वस्तूंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. महाबळेश्वरमधील सनराईज कॅण्डल्स या नेत्रहीन व्यक्तींच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या मेणबत्त्या कशा तयार केल्या जातात याची झलक दाखवली आहे. “प्रेमासाठी रस्ता उजळवण्याचं काम… अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळा पारंपारिक भारतीय कला साजऱ्या करण्यासाठी एक महत्वपूर्ण सोहळा ठरणार आहे. महाबळेश्वरमधील नेत्रहीन कारागीरांनी आपल्या हातांनी तयार केलेल्या मेणबत्त्या या सोहळ्यात दिल्या जाणार असल्याचा अभिमान वाटतोय,” अशा अर्थाची कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

याशिवाय या प्री-वेडिंग सेरेमनीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाहुणेही उपस्थित राहणार आहेत. ज्यात गायिका रिहाना, जागतिक स्तरावरील जादूगार डेविड ब्लेन, मॉर्गन स्टॅनलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेट पिक, डिझ्नीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर, ब्लॅकरॉकचे कार्यकारी अधिकारी लॅरी फिंक, एडनॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जाबेर यासारख्या मान्यवरांचा समावेश असणार आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button