breaking-news

भरचौकात प्राध्यापक तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली; 40 टक्के भाजली, उपचार सुरू

नागपूर | महाईन्यूज

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भरचौकात तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित तरुणी 40 टक्के भाजली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. ही घटना हिंगणघाट परिसरातील नंदोरी चौकात घडलेली आहे. पीडित तरुणी तुळसकर कॉलेजची प्राध्यापिका आहे. तर आरोपी विकेश नगराळे आणि इतर दोघे घटनास्थळावरून पसार झालेच होते. परंतु, पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याच्यासोबत आणखी दोन जण कोण होते याचा देखील शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सोबतच, ट्विट करून त्यांनी यासंदर्भात माहिती देताना कठोर कारवाईचे आश्वासन दिले. “वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय असून पोलीस अधीक्षक वर्धा यांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत, संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई होईल.” असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button