breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Lockdown: वीस जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांना परवानगी द्या; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करोना विषाणूचा संसंर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टंसिंग पाळून २० नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न समारंभाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच टाळेबंदीत शेतकऱ्यांना बांधावर इंधन (डिझेल) पुरवठा करण्यासाठी मोबाईल गाडी तयार करण्यात आली असून किराणा माल घरपोच देण्यासाठी ‘निडल’ ॲप विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन करोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री मुंडे यांनी सांगितले की, टाळेबंदी शेतकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी थेट बांधावर डिझेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मोबाईल डिझेल व्हॅन तयार करण्यात आली असून या सेवेची सुरूवातही झाली आहे. जिल्हयात ११ मोबाईल व्हॅन असणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी अवजारांसाठी डिझेलचा प्रश्न मिटणार आहे. शेतकऱ्यांने फोन करताच बांधावर डिझेल पोचवले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button