ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नेवाळे वस्तीत दारूच्या नशेत गळा चिरून खून

पिंपरी चिंचवड | नेवाळे वस्ती येथे एका व्यक्तीचा दारूच्या नशेत गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याची घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी उघडकीस आली.वीरेंद्र वसंत उमरगी (वय 42, रा. गणेश सिद्धी पार्क, नेवाळे वस्ती, चिखली. मूळ रा. विजापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र उमरगी ओम लॉजीस्टिक कंपनीत काम करत होता. तिथून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना ग्रॅच्युटीचे पैसे मिळाले होते. वीरेंद्र यांचे पत्नीशी भांडण झाले होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ते विभक्त राहत होते.

वीरेंद्र यांना दारूचे व्यसन होते. दारू पिणारे मित्र त्यांच्याकडे ये जा करत होते. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. दरम्यान त्यांच्या मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. मित्राने येऊन बघितले असता मृतदेह आढळला.

वीरेंद्र यांची दारूच्या नशेत त्यांची हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button