breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: लाखो लिटर बीअर अक्षरश: जातेय गटारात

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. २४ मार्च पासून देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून तो आता ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फटका उद्योगधंद्यांनाही बसला आहे. यादरम्यान दिल्ली-एनसीआरमधील मायक्रोब्रुअरीजकडून हजारो लिटर बीअर नाल्यांमध्ये सोडण्यात येत आहे.

आतापर्यंत एनसीआरमध्ये तब्बल १ लाख लिटर फ्रेश बीअर नाल्यांमध्ये सोडण्यात आली आहे. ती बीअर या ठिकाणी असलेल्या प्लांटमध्ये पडून होती. तसंच ती बाटल्यांमध्येही भरण्यात आली नव्हती. ही बीअर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या उत्पादनापेक्षाही अधिक खर्च येत होता. त्यामुळे ही बिअर नाल्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. लाखो लिटर बीअर टाकून द्यावी लागल्यामुळे बीअर उत्पादकांच्या तोंडाला फेस आल्याचं दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button