breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Lockdown : महापालिकेच्या अन्य रुग्णालयात सुध्दा नागरिकांना ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना कोविड – 19 या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी व प्रतीबंधा साठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे इतर राज्यातील तसेच महाराष्ट्राचे बाहेर जिल्हयातील स्थलांतरीत मजूर, पर्यटक, विद्यर्थी अडकून पडलेले आहेत. या सर्वांना त्यांचे इच्छेनुसार मूळ गावी जाण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्या आलेली आहे.

या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी खाजगी नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीक यांचेकडे करता येईल. त्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेचे दवाखाने व रुग्णालय या मध्ये सुध्दा तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोरोना कोविड 19 साठी निर्धारीत केलेले रुग्णालय असून नागरीकांनी त्या ठिकाणी तपासणीसाठी गर्दी करु नये असे आवाहन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे परीसरात खालील दवाखाने तपासणी साठी उपलब्ध आहेत .

अ क्षेत्रीय कार्यालय : आकुर्डी रुग्णालय, संभाजीनगर येथील साई अंब्रेला डिस्पेंसरी दत्तनगर दवाखाना चिंचवड, इ. एस. आय. हॉस्पीटल मोहननगर, भाटनगर दवाखाना भाटनगर पिंपरी, चिंचवड स्टेशन दवाखाना एमआयडीसी ऑफीस समोर चिंचवड

ब क्षेत्रीय कार्यालय : काळेवाडी दवाखाना पोलीस चौकीसमोर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (नविन तालेरा रुग्णालय) चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना – दळवीनगर, बिजलीनगर दवाखाना, वाल्हेकरवाडी दवाखाना, किवळे दवाखाना – मनपा शाळेजवळ.

क क्षेत्रीय कार्यालय : नेहरूनगर दवाखाना – मनपा गोडाउन जवळ, खराळवाडी दवाखाना –

ड क्षेत्रीय कार्यालय : पिंपळे गुरव दवाखाना – मनपा शाळेजवळ पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर दवाखाना, पुनावळे दवाखाना, पिंपळे निलख दवाखाना – औध कॅम्प पुणे.

इ क्षेत्रीय कार्यालय : भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, चहोली दवाखाना, दिघी दवाखाना, बोपखेल दवाखाना, नवीन भोसरी रुग्णालय – अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर भोसरी.

फ क्षेत्रीय कार्यालय : घरकुल दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, तळवडे दवाखाना, प्राधिकरण दवाखाना – सिंधुनगर निगडी. म्हेत्रेवस्ती दवाखाना.

ग क्षेत्रीय कार्यालय : जिजामाता दखावाना – जुन्या डिलक्स टॉकीजवळ पिंपरी, पिंपरी वाघेरे दवाखाना – पिंपरी गाव, थेरगाव रुग्णालय – थेरगाव.

ह क्षेत्रीय कार्यालय : वायसीएम रुग्णालय – संत तुकाराम नगर, सांगवी रुग्णालय – जूनी सांगवी , कासारवाडी दवाखाना, दापोडी दवाखाना, फुगेवाडी दवाखाना, जिल्हा रुग्णालय पुणे – औध रोड सांगवी पुणे.

या ठिकाणीही फ्ल्यू क्लीनीक सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणीही नगरीकांना आपली तपासणी करुन प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. या शिवाय खाजगी रुग्णालयात तपासणी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येणार आहे. येथील प्रमाणपत्रही पर राज्यात व पर जिल्ह्यात जाण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button