breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खिडकी योजना आणावी; आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या प्रशासनाला सूचना

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्हयात वाढत जाणाऱ्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत ससून रुग्णालयात आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. याबैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button