breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मावळे असतात म्हणून राजे असतात, राजांना पक्षांचं वावडं असू नये : संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना लढेल, असं म्हटलंय. शिवसेनेच्या दृष्टीनं सहाव्या जागेचा चॅप्टर क्लोज झालेला आहे. मुख्यमंत्री नक्कीच संभाजीराजेंचा आदर ठेवतील, असं संजय राऊत म्हणाले. आम्ही त्यांचा आदर ठेवण्यासाठी त्यांना शिवसेनेकडून लढण्याचा प्रस्ताव दिला. संभाजीराजेंना अपक्ष लढायचं असेल तर त्यांच्याकडे ४२ मतं असतील. आमच्याकडे प्रस्ताव आला त्यावेळी गादीचा सन्मान, छत्रपतींचा सन्मान याचा विचार करुन त्यांना प्रस्ताव दिला होता, असं संजय राऊत म्हणाले. मावळे असतात म्हणून राजे असतात असं देखील संजय राऊत म्हणाले.

आम्ही कुणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला जबाबदार नाही, प्रीतिश नंदी, एकनाथ ठाकूर आणि प्रियांका चतुर्वेदी हे पक्षाचे उमेदवार होते. यापूर्वी शाहू महाराज यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले आहेत. मालोजीराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचं दोन संजय राज्यसभेत जाणार हे फायनल झालेलं आहे. संजय पवार हे शिवसेनेचे मावळे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासंदर्भात अधिकृत घोषणा नंतर केली जाईल. राजांना पक्षाचं वावडं असू नये, असं संजय राऊत म्हणाले.

संजय पवार कोण आहेत?

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले. शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. त्यामुळे लढाऊ कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक अशी पवारांची कायमची ओळख. भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना आमिष दाखवत पक्षात घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिक ही ओळख कायम ठेवण्यातच पवारांनी आनंद मानला.

संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार?

संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईला पोहोचल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button