breaking-newsराष्ट्रिय

बापरे! मंदिराबाहेरील भिकाऱ्याने दिली साईचरणी ‘इतक्या’ लाखांची देणगी…

विजयवाडा | महाईन्यूज

एकीकडे महाराष्ट्रात साईबाबा यांचा जन्म कुठे झाला यावरुन वादंग निर्माण झालेला असताना हा वाद कोर्टापर्यंत गेला आहे. तर साईबाबांनी दिलेली शिकवण आजही साईभक्त मोठ्या श्रद्धेने पाळत आहेत. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे साई मंदिराबाहेर बसणाऱ्या ७३ वर्षीय भिकाऱ्याने साई मंदिराला तब्बल ८ लाखांची देणगी दिल्याने परिसरात चर्चा होऊ लागलेली आहे.

७३ वर्षीय याडी रेड्डी असं या भिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या ७ वर्षापासून याडी रेड्डी मंदिराबाहेर भीक मागण्याचं काम करत आहे. जवळपास ४ दशक याडी रेड्डी यानी सायकल रिक्षा खेचण्याचं काम केलं. एका अपघातात त्यांना आपले पाय गमवावे लागले त्यानंतर त्यांनी मंदिराबाहेर भीक मागण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत बोलताना याडी रेड्डी म्हणाले की, गेली ४० वर्ष मी रिक्षा खेचण्याचं काम करत होतो. सुरुवातीला मी १ लाख रुपये देणगी साई मंदिरासाठी दिली. त्यानंतर माझी तब्येत खालावत असल्याने माझ्याकडे असणाऱ्या पैशाची मला गरज भासली नाही म्हणून मी मंदिरासाठी आणखी देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button