breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात इलेक्ट्रॉनिक कंपनीला भीषण आग

पुणे:- पुण्यातील कात्रज बायपास रोडवरील मंतरवाडी चौकाजवळील इलेक्ट्रॉनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंपनी जळून खाक झाली आहे. अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बायपास रोडवरील मंतरवाडी चौकाजवळ इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे. त्या कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीने काही मिनिटात रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्नीशमन दलाच्या पाण्याच्या तीन गाडीच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिका हायटेक मशीन टूल्स प्रा लि. या 10,000 स्के.फुट असलेल्या जागेत सकाळी 7 च्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मिळाली. या कंपनीत असणारया इलेक्ट्रॉनिक मशनरी, वायरिंग, कटिंग टूल्स, लोखंङी अॅगल व इतर साहित्य जळाले आहे. आगीचे कारण समजले नाही. जखमी कोणी नसून अग्निशमन दलाच्या कोंढवा बुद्रुक आणि हङपसर तसेच सेंट्रल फायर स्टेशन टॅंकर अशी तीन वाहनांनी आग अर्ध्या तासात विझवली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button