breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

इंग्लंड विरुद्ध सामन्यात विक्रमी खेळीनंतर वडिलांच्या आठवणीत भावुक झाला कृणाल पांड्या, पाहा व्हिडिओ

पुणे – भारत विरुद्ध इंग्लंड या पहिल्या ODI सामन्यात कृणाल पांड्याने उल्लेखनीय कामगिरी केली. जॉन माॅरिस यांनी 1990 साली केलेला विश्वविक्रम कृणाल पांड्याने कालच्या सामन्यात मोडून काढला. जॉन माॅरिस यांनी 35 बॉलमध्ये 50 रण काढून आपल्या नावे रेकॉर्ड बनवला होता. त्यानंतर पांड्याने आता 26 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण करून जॉन माॅरिस यांचा रेकॉर्ड मोडून काढला. त्यानंतर, कृणालला आपले अश्रू अनावर झाल्याने त्याचा लहान भाऊ हार्दिक पांड्या याच्या गळ्यात पडून तो रडू लागला. तसेच आपला नवा विक्रम त्याने वडिल हिमांशू पांड्या यांना समर्पित केला आहे.

वाचा :-#INDvsENG पहिल्या वनडेत भारताचा दणदणीत विजय; कृणाल-कृष्णाचे दमदार पदार्पण

कृणालच्या वडीलांचं जानेवारी महिन्यात निधन झालं. त्यामुळे त्यांच्या आठवणीत कृणाल भावुक झाल्याचं कळतंय. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यासंबंधीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कृणाल पांड्या आपल्या लहान भावाला मिठी मारून रडत असल्याचं दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरु असतानाच वडिलांची निधनवार्ता कळाल्यामुळे कृणालला स्पर्धा सोडून परत जावं लागलं होतं. वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलांनी क्रिकेटमध्ये मोठं नावलौकिक मिळवावं त्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली आणि कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. पण आता या दोघांची विजयी खेळी अनुभवण्यासाठी त्यांचे वडील या जगात नाहीत हे मोठं दुर्दैव.

कृणालने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आजची इनिंग आपल्या वडिलांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर कृणाल वडिलांच्या आठवणीमध्ये पुन्हा एकदा भावुक झाला आणि त्याला शब्द सुचत नव्हते, त्यामुळे त्याने स्टार स्पोर्ट्सची माफी मागितली आणि तो तिथून निघून गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button