breaking-news

#Lockdown:लॉकडाऊन काळात शिर्डीत साईंचरणी इतक्या कोटींचं दान

शिर्डी : कोरोना व्‍हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर १७ मार्चपासून साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलं आहे. साईबाबा मंदिर बंद असलं तरी भक्तांना साईबाबाचं ऑनलाईन दर्शन घेता येत आहे. भक्तांकडून साईचरणी ऑनलाईन माध्यमातून दानही करण्यात येत आहे. 

१७ मार्च २०२० ते १६ मे २०२० या ६० दिवसांच्‍या कालावधीत २१ हजार ६४९ साईभक्‍तांकडून ऑनलाईनद्वारे दान करण्यात आलं आहे. साई भक्तांकडून ३ कोटी २२ लाख १० हजारांहून अधिक रुपयांची देणगी देण्यात आली आहे. साई बाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिर्डीत साईंच्या चरणी भक्तांकडून वर्षभरात जवळपास ६०० कोटी रुपयांचं दान केलं जातं. म्हणजेच जवळपास दररोज १ कोटी ६४ लाख रुपयांहून अधिक दान दिलं जातं. मात्र लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळांच्या देणगीवरही याचा परिणाम होतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button