breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात मागील २४ तासात सापडले ५ हजार कोरोना रुग्ण

नवी दिल्ली | लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ झाली आहे. यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान २, ८७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबद्दल माहिती दिली आहे.

लॉकडाऊन ४ संदर्भात आज केंद्रीय गृह विभागाचे निर्देश येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन ४ हा पूर्णपणे नवा असेल असेही ते म्हणाले. यामध्ये अनेक प्रकारचे बदल आणि सवलती दिल्या जातील असेही ते म्हणाले होते. भारतातही करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारी लस शोधण्यासाठी संशोधन सुरु आहे. केंद्र सरकारने करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी पीएम केअर्स फंडातून १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. बायोटक्नोलॉजी विभागाच्या माहितीनुसार वैद्यकीय संस्था, स्टार्ट अप यांच्या माध्यमातून लस संशोधनाच्या २५ प्रकल्पांवर भारतात काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button