breaking-newsमहाराष्ट्र

#Lockdown:लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोनमध्ये एसटी वाहतूक सुरु

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नॉन रेड झोनमध्ये एसटी बसेस पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, परभणी, नांदेड, लातूर, वर्धा यांसह अनेक नॉन रेड झोन जिल्ह्यात लॉकडाऊनंतर लालपरी पुन्हा एकदा धावली. या एसटीत वृद्ध-गर्भवती महिला आणि लहान मुले यांना प्रवेश दिला जात नाही.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील एसटी सेवा सुरु करण्यात आली. यानुसार सर्व नॉनरेड झोनमध्ये एसटी महामंडळाच्या वतीने जवळपास 70 बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरु झाली. यात सोशल डिस्टनसिंगचं पालन करण्यात येत आहे. ही सेवा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान नाशिक महापालिका हद्द आणि मालेगाव महापालिका हद्द वगळता संपूर्ण जिल्ह्यात लालपरी धावणार आहे.

त्याशिवाय परभणी, लातूर, नांदेड या ठिकाणीही जिल्हा अंतर्गत प्रमुख मार्गांवर एसटी बससेवा सुरु करण्यात आली. नांदेडमध्ये 22 एसटीद्वारे 132 फेऱ्यांची वाहतूक केली जाणार आहे. तसेच वर्धा जिल्ह्यातील पाच आगारातून 125 बसचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ही बसवाहतूक सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार असून केवळ जिल्हा अंतर्गत वाहतूक असणार आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या बसचा परिवहन विभागाला वर्ध्यात जवळपास 10 कोटींचा फटका बसला आहे.

तर दुसरीकडे नॉन रेड झोन असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हातंर्गत एसटी बस सुरु करण्यात आली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी या पाच प्रमुख मार्गावर एसटी धावणार आहे. दरम्यान प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार निम्म्या प्रवासी क्षमतेवर एसटी सेवा सुरु झाली. मात्र प्रवासी नसल्याने एकही एसटी मार्गस्थ झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या प्रतिक्षेत एसटी चालक आणि वाहक स्थानकातच बसून होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध 32 मार्गावरुन 52 एसटी बसेस नियोजन करण्यात आलं. सोशल डिस्टसिंग ठेवून एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. एसटी बस सॅनिटाईज करून प्रवाशांना पूर्व इतक्याच तिकीट दरात त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी सोडण्यात येत आहे.

त्याशिवाय जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरातही लालपरी सुरु झाली. त्यानुसार मुक्ताईनगर आगारातून काही ठराविक बस गाड्या सोडण्यात आल्या. बससेवा जरी सुरू झाली तरी प्रवाशांची संख्या अतिशय मर्यादित होती. चंद्रपूर जिल्ह्यात एसटी बस सेवेची सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या अंतर्गत भागात सुरू झालेल्या एसटीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवासी कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रवास करावा की नाही या संभ्रमात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button