breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अफगाणिस्तान, पाकिस्तानसह उत्तर भारतालादेखील भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली | महाईन्यूज

दिल्ली-एनआरसी जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक भाग इतकेच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान शुक्रवारी सायंकाळी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदविली गेली. भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. मात्र या भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाहीये.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला दिल्ली-एनआरसी, जम्मू-काश्मीर, चंडीगड, श्रीनगर, फरिदाबाद, हिमाचल प्रदेशातील चंबा आणि डलहौसी, उत्तर भारतातील नोइडा, गझियाबाद, मथुरा आणि मेरठला भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांमुळे अनेकांच्या घरातील भांडी आणि अन्य सामान खाली पडलेले आहे. भूकंपाचे धक्के बसताच भयभीत झालेल्या लोकांनी घरातून आणि कार्यालयातून त्वरित पळ काढल्याचेही वृत्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button